Tag: memories

Read More

मदर्स डे अर्थात मातृदिन

मदर्स डे किंवा मातृदिनाची कल्पना पाश्चिमात्य असली तरी ती मला एक चांगली प्रथा वाटते. किंबहुना असे काही दिवस साजरे करणं ही एक छान पद्धत आहे असं मला वाटतं. मे महिन्यातल्या दुस-या रविवारी मदर्स डे साजरा केला […]

Read More

बाबा आणि बापूकाका

आम्ही १९८२ मध्ये औरंगाबादला कायमचे राहायला आलो. बाबांची बरीच मित्रमंडळी औरंगाबादेत होती. शिवाय त्यांचं शिक्षण म्हणजे एम ए आणि लॉ औरंगाबादला झालं होतं. त्यामुळे बाबांना औरंगाबाद नवं नव्हतं, पण आमच्यासाठी ते सगळं नवं होतं. औरंगाबादला आम्ही नवीन उस्मानपु-यात राहायला लागलो. पहिल्याच दिवशी बाबा मला श्रेयनगरमधल्या त्यांच्या मित्राच्या घरी घेऊन गेले, सुधीर रसाळांच्या घरी.
मी बापूकाकांना आधी भेटले होते तेव्हा फार लहान होते त्यामुळे माझ्यासाठी ते नवीनच होते. काका तेव्हा विद्यापीठात जायच्या तयारीत होते. मला पक्कं आठवतंय काका कांदा टोमँटोची कोशिंबीर करत होते, सोनल शाळेत निघाली होती तिच्यासाठी. एका बाजूला त्यांच्या आणि बाबांच्या गप्पा सुरू होत्या आणि खळखळून हसणंही.

Read More

घरातल्या विजयाबाई

मावशीच्या आणि माझ्या लग्नापूर्वीच्या आयुष्यात बराच सारखेपणा आहे. आम्ही दोघीही मुंबईत येण्यापूर्वी लहान शहरांमधे राहत होतो. तिचं माहेर कोल्हापूरचं तर माझं माहेर औरंगाबादचं. त्यामुळे शहरातल्या, विशेषतः मुंबईतल्या लोकांना ज्या गोष्टी माहितही नाहीत आणि अनुभवयालाही मिळत नाहीत अशा ब-याच गोष्टी आम्ही दोघींनी अनुभवल्या आहेत. लहान गावातली संस्कृती, तिथल्या लोकांचे एकमेकांशी असलेले संबंध, तिथली जीवनपध्दती हे मुंबईपेक्षा खूप वेगळं असतं आणि ते आम्हा दोघींनाही माहीत आहे. त्यामुळे असेल कदाचित पण मला तिच्याबद्दल पहिल्यापासून आपलेपणा वाटला.

Read More

माझे आजी-आजोबा

माझी आजी जाऊन आज सहा वर्षं झाली. आजीचं खूप वय झालं होतं. गेली तेव्हा ती ९४ वर्षांची होती पण तरीही वयाच्या मानानं तल्लख होती. त्या वयातही तिचे बरेचसे दात शाबूत होते. लहानपणापासून आजी-आजोबांचा सहवास मला […]

Read More

गुलजार!

गुलजार हा तसा कॉलेजपासूनचा जिव्हाळ्याचा विषय. गुलजारांच्या कविता, गुलजारांचे चित्रपट आणि गुलजारांनी इतर चित्रपटांसाठी लिहिलेले संवाद आणि गाणी, सगळंच प्रिय होतं आणि अजूनही आहे. निरंजनला पहिल्यांदा भेटले तेव्हा पटकन् आपलेपणा वाटण्यात गुलजार हा महत्वाचा भाग […]

आजोबांची आठवण

माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्रामात ते दीड वर्ष तुरूंगात होते. हैदराबादला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी मागे पडलेल्या वकिलीला परत एकदा सुरूवात केली. बरोबरीनं त्यांचं सामाजिक काम चालूच होतं. गांधीवादी असलेल्या माझ्या आजोबांची राहणी अतिशय […]

Read More

मुकुंदराव आणि शांताबाई किर्लोस्कर

मी सध्या औरंगाबादेत आहे. काल आल्यावर रात्री झोपायच्या आधी काही वाचायला शोधत होते. तेव्हा आपले जगचा एक जुना अंक दिसला. मुकुंदराव किर्लोस्कर गेल्यानंतर त्यांच्या मासिक स्मृतिदिनानिमित्त काढलेला अंक. अंक वाचत गेले आणि मुकुंदरावांच्या आठवणी जाग्या होत गेल्या. अंकात त्यांचे वडील शंकरराव, शांताबाई, त्यांची बहिण मालती किर्लोस्कर, सुधीर गाडगीळ,हेमा श्रीखंडे आदींचे लेख आहेत. शिवाय मुकुंदरावांचं एक संपादकीय, त्यांची काही पत्रे आणि अर्थातच त्यांनी काढलेले कित्येक फोटोही.

Read More

मंगेश विट्ठल राजाध्यक्ष

भाईंना, माझ्या सास-यांना जाऊन आज पाच वर्षं झाली. माझं लग्न ठरलं तेव्हा ती मी औरंगाबादला दैनिक मराठवाड्यात काम करत होते. माझं लग्न मंगेश विट्ठल राजाध्यक्षांच्या मुलाशी ठरलंय हे कळल्यावर जयदेव डोळेंनी मला विचारलं होतं, “काय गं शालजोडी वाचलं आहेस का? काय अप्रतिम शैली आहे तुझ्या सास-यांची. अगदीच वेगळी.” तोपर्यंत मी भाईंचं काहीही वाचलं नव्हतं फक्त पु. ल. देशपांड्यांच्या लिखाणात त्यांचा उल्लेख वाचला होता. आणि नंतर नेहरूंनी त्यांच्या इंग्रजीचं कौतुक केल्याचं, त्यांना वर्डस्वर्थ पारितोषिक मिळाल्याचंही ऐकलं.
मी निरंजनला भेटायला आले तेव्हा आम्ही साहित्य सहवासात वा. ल. कुलकर्ण्यांच्या घरी उतरलो होतो. संध्याकाळी आमचं घर बघायला या असं मावशीनं, माझ्या सासुबाईंनी सांगितलं होतं. तसे आम्ही संध्याकाळी राजाध्यक्षांच्या घरी गेलो. ती माझी भाईंशी झालेली पहिली भेट. साधा कुडता आणि लुंगी अशा वेशातले भाई अगदी सौम्य, हसरे असे होते. अतिशय शालीनतेनं बोलणारे. मराठवाड्यात असे मुलीकडचे लोक भेटायला आल्यावर फारसं स्वागत करण्याची पध्दत तेव्हा तरी सर्रास नव्हती. त्यामुळे हे नवलाईचंच होतं.