Category: आरोग्य

Read More

हॉस्पिटल डायरी

इंग्रजीत एक म्हण आहे – जेव्हा तुम्ही बेसावध असता तेव्हा जे घडतं ते म्हणजे आयुष्य. याचा प्रत्यय प्रत्येकाला कधी ना कधी येतच असतो. माझ्याही बाबतीत तसंच झालं. 
नोव्हेंबर संपत आला होता. नुकतंच साड्यांचं मोठं प्रदर्शन झालं होतं. दिवाळी अंकही प्रकाशित झाला होता. त्या गडबडीतून मोकळी झाले होते. आता काही दिवस काहीच करायचं नाही, फक्त आराम करायचा असं मनोमन ठरवलं होतं. नोव्हेंबरच्या शेवटी औरंगाबादला जाणार होते. कलापिनीचं गाणं होतंच शिवाय २ दिवस आईबाबांबरोबर वेळ घालवावा असंही वाटत होतं. डिसेंबरच्या १५ तारखेला निरंजनला गोव्यात एक पुरस्कार मिळणार होता. त्यानिमित्तानं आम्ही दोघे ४ दिवस गोव्यात राहाणार होतो. तिकिटं काढलेली होती. १५ ते २१ जानेवारी काही मैत्रिणींबरोबर आसाम आणि मेघालयला जायचं ठरलं होतं. फ्लाईट तिकिटंही बुक करून झाली होती. एकूण फक्त आरामाचा मूड होता.

हिवाळ्यातली त्वचेची काळजी

हिवाळा आला की मला माझ्या आजोबांची आठवण येते. पाय फुटायला लागले की ते खादी ग्रामोद्योगाच्या दुकानातून आमसुलाचं तेल आणायचे. मग रात्री झोपण्याआधी ते तेल गरम करून ते पायाच्या भेगांमध्ये भरून मग झोपायचे. माझ्या बहिणीला मातीची […]

वजनाचं व्यवस्थापन

मी आता ४५ वर्षांची आहे आणि गेली निदान २५ वर्षं मी नेमानं चालते आहे. मला रमतगमत चालायला खूप आवडायचं कॉलेजमध्ये. युनिव्हर्सिटीत एमए करत असताना तर खूपदा चालत घरी यायचे. साधारणपणे ६ किलोमीटर होतं विद्यापीठ. मी आणि माझी मैत्रीण सोनाली रोज फिरायला जायचो. अर्थात त्यात फार काही व्यायाम वगैरे करावा असं मनात नव्हतं. टाइमपासच जास्त होता.

पुढे लग्न झाल्यावर मुंबईत आले. लग्नानंतर नव-याला चालायला न्यायला लागले. पुढच्या काही वर्षातच त्याला high cholesterol निघालं. त्यामुळे मग तोही नियमित चालायला लागला. आणि १४ वर्षांपूर्वी त्याची angioplasty झाली. स्मोकिंग करत नसतानाही किंवा डायबेटिस नसतानाही. त्यानंतर मात्र आमच्या संपूर्ण घराची जीवनपद्धतीच बदलून गेली. खाण्यापिण्यावर नियंत्रण आलं. अधिक पौष्टिकतेचा विचार व्हायला लागला आणि मुख्य म्हणजे व्यायाम हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनला.